spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – खामगावमध्ये राष्ट्रवादी(श.प)गटाच्या नेत्याचे विषप्राशन; फसवणूक प्रकरणानंतर खळबळजनक पाऊल!

खामगाव (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप झेलत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी तालुका अध्यक्ष माधव पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ३ जून रोजी गवंढाळा येथे घडली.पाटील यांच्या विरोधात रामटेक येथील शेतकरी आनंद खंते यांच्या आत्महत्येनंतर फसवणुकीचा गंभीर आरोप आहे. लाखो रुपयांची फसवणूक झाल्यामुळे खंते यांनी जीव दिला. या प्रकरणी २ एप्रिल रोजी रामटेक पोलिसांनी पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १० एप्रिल रोजी पोलिसांनी खामगाव व गवंढाळा येथील फार्महाऊसवर शोधमोहीम राबवली, मात्र पाटील पसार झाले होते.

दबावात आलेल्या पाटील यांनी अखेर ३ जून रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने खामगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.या प्रकारामुळे संपूर्ण खामगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेतकरी आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा हा टोकाचा निर्णय अनेक प्रश्न निर्माण करीत आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई होण्याआधीच आत्महत्येचा प्रयत्न करणे, हा गुन्हा लपविण्याचा केवळ प्रयत्न तर नाही ना, असा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!