बुलढाणा (हॅलो बुलडाणा) भगवान महावीर जयंती 10 एप्रिल रोजी देशात साजरी होणार आहे.या अनुषंगाने बुलढाणा शहरात मांस विक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून नगर परिषदेने यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
भगवान महावीर स्वामींनी जगाला अहिंसा, जगा आणि जगु द्या हा संदेश दिला, त्याला अनुसरून शासन निर्णयानुसार 10 एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश बुलढाणा नगर परिषद प्रशासनाने जारी केले आहे.
बुलडाणा नगर परिषद हद्दीत 10 एप्रिल रोजी महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार 10 एप्रिल रोजी बुलडाणा शहरात कोठेही मांस विक्री करु नये. सदर सुचनेनुसार बुलडाणा शहर हद्दीमध्ये कोणत्याही व्यक्ती/नागरीक मास विक्री करतांना निदर्शनास आल्यास नगर परिषद अधिनियम 1965 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येवुन वेळप्रसंगी संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा बुलढाणा नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिला आहे.