बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्रीराम नवमी शोभायात्रा हे भगवान राम नवमी यांच्या जन्मोत्सवाचे प्रतीक आहे. त्यामुळे ‘राम आयेंगे! ही आस्था प्रत्येकांच्या मनात आहे.याच अनुषंगाने श्रीरामांची शोभायात्रा श्रीराम नवमी समितीतर्फे विष्णूवाडीतील गजानन महाराज चौक ते कारंजा चौक दरम्या
६ एप्रील रोजी सायंकाळी पाच वाजता निघणार आहे. शोभायात्रा ची सुरुवात श्री गजानन महाराज चौक विष्णूवाडी बुलढाणा येथून होणार आहे. श्रीराम नवमी शोभायात्रा हे भगवान राम यांच्या जन्मोत्सवाचे प्रतीक आहे, भगवान राम हे सत्य, धर्म आणि न्यायाचे प्रतीक आहेत. त्यामुळे ही शोभायात्रा वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. या शोभायात्रेत भक्त एकत्र येतात, भक्तीभावाने रामचरित्राचे स्मरण करतात, आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करतात.
सामाजात ही शोभायात्रा लोकांना एकत्र आणते आणि सामाजिक संबंध दृढ करते.दरम्यान या शोभायात्रेमध्ये अनेक पथक दाखल होणार आहेत.