बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि घरांचे नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संवेदनशील असल्याचा ढोल पिटाळणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक भरपाई देवून संवेदनशीलता जपावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ॲड. जयश्री शेळके यांनी केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना हमीभाव आणि कर्जमाफीची आश्वासन देऊन केवळ शेतकऱ्यांची बोळवण केली. आणि आता आसमानी व सुलतानी संकटात शेतकरी होरपळत आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी राज्यसह जिल्ह्यात 166 गावात प्रचंड शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे.शेतीमालाला भाव नाही त्यामुळे सुलतानी संकट आणि आता अस्मानी संकटाखाली दबलेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी सरकारने संवेदनशील होऊन नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी, ॲड. जयश्रीताई शेळके यांनी केली.