चिखली (हॅलो बुलडाणा प्रतिनिधी) चिखली-मेहकर रोडवर खैरव फाट्याजवळ मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला. ट्रक, डस्टर कार आणि दुचाकीच्या तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रकने डस्टर कारला जबर धडक दिली. याच वेळी दुचाकी या दोन्ही वाहनांमध्ये सापडल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला. दुचाकीवर असलेल्या अंदाजे 45 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत असलेला युवक उपचारासाठी चिखलीच्या जवंजाळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले.
या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्या साचल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. निष्काळजी वाहनचालकांच्या माजोरीपणामुळे तिघांचा बळी गेला आहे.