सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) कधी कुणाचा खून होईल याची शाश्वती नाही,कारण गुन्हेगारी खूप वाढली आहे.सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक खून झाल्याचा संशय आहे.रताळी येथील गायकवाड यांच्या शेतात एक प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नारायण मैंद असे मृतकाचे नाव असल्याची माहिती आहे. ते रायता चिखलीचे राहणारे आहेत.
जुन्या वैमनास्यातून
खून झाला की काय?याचा पोलीस तपास घेत आहेत.तत्पूर्वी सदर मृतक बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांकडून नोंदविण्यात आली होती.मात्र 5 एप्रिल रोजी सकाळी गायकवाड यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक होणार असल्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले.