spot_img
spot_img

वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या कुऱ्हाडीवर! – मनसेचा खळबळ जनक आरोप! – कर्तव्यात कसूर करणाऱ्या वनपाल खान व शिंदे यांचेवर कारवाई करण्याची मागणी!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चिखली तालुक्यात वन अधिकाऱ्यांचेच हात वृक्ष तोडणाऱ्यांच्या पाठीशी असल्याचा मनसे कडून आरोप करण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.

चिखली तालुक्यात दररोज शेकडो वृक्ष तोडुन चिखली शहरातील खबुतरे ले. आऊटच्या पाठीमागे, ग्रामिण रुग्णालय परीसर, सैलानी नगरात तोडलेली लाकडे साठविली जात असुन सदर लाकडे वाळली की ते उचलुन त्या ठिकाणी पुन्हा नव्याने लाकडे साठविली जात आहे. सदर गंभीर विषयांकडे वन विभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. याबाबत चिखली येथील वनपाल खान यांचशी फोन वरुन संपर्क साधला असता त्यांनी कोणताही पंचनामा अथवा मोक्यावर पाहणी केली नाही. मात्र गत काही वेळातच त्या ठिकाणाहुन साठविलेली लाकडे दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आली त्यामुळे वनपाल यांनीच त्यांना सावध केल्याचा संशय आला होता त्यामुळे मनसेच्या वतीने यापूर्वी दिनांक २३ मे रोजी २०२५ बुलडाणा उप वनसंरक्षक, श्रीमती. सरोज गवस यांना निवेदन दिले होते व त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुरवठयामुळे वनविभागाचे कर्मचारी गजानन शिंदे यांनी नाममात्र मोक्यावर आले असता मनसे पदाधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्यक्ष लाकुड ठिय्याचे ठिकाणे त्यांना दर्शविली व त्यांना संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली मात्र त्यांनी थातुरमातुरपणे नाममात्र पाहणी केली असुन अवैध वृक्षतोड करणाऱ्या लाकुडतोड्यांवर मात्र कोणतीही कायदेशिर कारवाई केल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने दिनांक 2 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले असुन आपले स्तरावरुन संबंधीत लाकुडतोडयांवर तात्काळ कायदेशिर कारवाई करुन त्यांना पाठीशी घालणाऱ्या वनपाल खान व गजानन शिंदे यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!