सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा /अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती वाहतूक जोमात सुरू असून,महसूल पथक ॲक्शन मोडवर आले आहे. एक एप्रिल रोजी दुसरीबीड येथे तर सिंदखेडराजा येथे सुद्धा एका वाहनावर कारवाई करण्यात आली आहे,दोन्ही वाहने किनगाव राजा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे.त्याचबरोबर दोन एप्रिल रोजी हिवरखेड येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली तसेच मलकापूर पांगरा येथे तीन एप्रिल रोजी एका वाहनावर कारवाई करण्यात आली. गत ३ दिवसांमध्ये 4 वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अवैध रेती वाहतूक बंद करावी,अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी दिला आहे.
त्यामुळे अजित दिवटे सध्या चांगलेच ॲक्शन मोडवर आले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर होणाऱ्या कारवाई मुळे वाहतूक करणाऱ्याच्या मनात धडकी भरली आहे.